Shruti Vilas Kadam
उन्हाळ्यात उष्णतेपासून बचावासाठी साप थंड जागांचा शोध घेतात. त्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागात साप दिसण्याच्या तसेच साप चावण्याच्या घटना वाढतात.
साप चावल्यानंतर अनेकजण जखमेवर घट्ट कापड किंवा दोरी बांधतात. मात्र त्यामुळे रक्तप्रवाह कमी होऊन सूज आणि अवयव निकामी होण्याचा धोका वाढू शकतो.
घाबरल्यामुळे हृदयाचे ठोके वाढतात आणि विष शरीरात वेगाने पसरू शकतं. त्यामुळे रुग्णाला शांत ठेवा आणि त्यांची हालचाल शक्य तितकी कमी करा.
सर्पदंश झालेला हात किंवा पाय जास्त हलवू देऊ नका. बाधित अवयव हृदयाच्या पातळीखाली ठेवण्याचा प्रयत्न केल्यास विषाचा प्रसार कमी होण्यास मदत होऊ शकते.
जखम कापणे, विष चोखण्याचा प्रयत्न करणे, बर्फ लावणे किंवा घरगुती उपाय करणे धोकादायक ठरू शकते. अशा चुकीच्या उपायांमुळे परिस्थिती अधिक गंभीर बनू शकते.
सर्पदंशावर प्रभावी उपचार म्हणजे अँटीव्हेनम इंजेक्शन. त्यामुळे वेळ न दवडता रुग्णाला जवळच्या सरकारी किंवा योग्य रुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहे.
शक्य असल्यास सापाचा रंग किंवा आकार लक्षात ठेवा किंवा डॉक्टरांना कळावे यासाठी जमल्यास त्याचा फोटो काढा. पण त्याला पकडणे किंवा मारण्याचा प्रयत्न करू नका. यामुळे आणखी धोका निर्माण होऊ शकतो.