How to Clean Shirt Collar: पांढऱ्या शर्टची मळलेली कॉलर काही मिनिटांत होईल स्वच्छ; एकदा करा हा घरगुती उपाय

Shruti Vilas Kadam

बेकिंग सोडा आणि पाण्याची पेस्ट वापरा

बेकिंग सोडामध्ये थोडं पाणी मिसळून पेस्ट तयार करा आणि कॉलरवर लावा. १५ मिनिटांनी हलक्या हाताने घासून धुवा.

How to Clean Shirt Collar

व्हिनेगरमुळे हट्टी डाग निघतात

पांढरा व्हिनेगर कॉलरवरील तेलकट आणि काळे डाग कमी करण्यास मदत करतो. व्हिनेगर स्प्रे करून काही मिनिटांनी धुवून टाका.

How to Clean Shirt Collar

लिक्विड डिटर्जंटने प्री-क्लिनिंग करा

कॉलरवर थोडं लिक्विड डिटर्जंट लावून टूथब्रशने हलक्या हाताने घासा. यामुळे मळ पटकन निघतो.

How to Clean Shirt Collar

लिंबाचा रस

लिंबामधील नैसर्गिक अॅसिड डाग कमी करण्यास मदत करते. कॉलरवर लिंबू चोळून १० मिनिटांनी धुवा.

How to Clean Shirt Collar

टूथपेस्ट

पांढरी टूथपेस्ट जी दात घासण्यासाठी वापरली जाते ती शर्टच्या कॉलरवरील हलके डाग काढण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरते. डाग पडलेल्या कॉलरवर पांढऱ्या टूथपेस्टचा थोडासा थर लावा आणि त्यानंतर जुन्या टूथब्रशने हलक्या हाताने घासा. ती तशीच साधारण ५ मिनिटे राहू द्या आणि त्यानंतर साध्या पाण्याने धुवून टाका.

How to Clean Shirt Collar

गरम पाण्याचा वापर करा

हलके गरम पाणी डाग मऊ करण्यास मदत करते. त्यामुळे कॉलर साफ करणे सोपे होते.

How to Clean Shirt Collar

लिंबू आणि मिठाची जोडी

लिंबामध्ये नैसर्गिक 'ब्लीचिंग एजंट्स' (रंग उजळवणारे घटक) असतात, जे कपड्यांचा रंग उजळवतात. एका लिंबाचा रस पिळून घ्या आणि त्यात थोडेसे मीठ मिसळा. हे मिश्रण कपड्याच्या कॉलरवर लावा आणि २ ते ३ मिनिटे हलक्या हाताने चोळा.

How to Clean Shirt Collar

Sabudana Vada Recipe: साबुदाणा वडा खाताना पीठ लागतं? मग रेसिपीमध्ये करा हा छोटा बदल, वाचा सिक्रेट रेसिपी

Sabudana Vada | Canva
येथे क्लिक करा