Shruti Vilas Kadam
१ कप साबुदाणा, ३-४ उकडलेले बटाटे, भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरे, मीठ, साखर आणि तळण्यासाठी तेल लागेल.
साबुदाणा स्वच्छ धुऊन ४ ते ५ तास किंवा रात्रभर कमी पाण्यात भिजत ठेवा. साबुदाणा मोकळा आणि फुललेला असावा.
एका मोठ्या भांड्यात भिजवलेला साबुदाणा, कुस्करलेले बटाटे, शेंगदाण्याचा कूट, हिरवी मिरची, जिरे, कोथिंबीर, मीठ आणि थोडी साखर घालून चांगले मिक्स करा.
तयार मिश्रणाचे छोटे गोळे करून हाताने हलकेच दाबत वड्यासारखा आकार द्या. मिश्रण जास्त सैल वाटल्यास थोडा शेंगदाणा कूट घाला.
कढईत तेल गरम करून वडे मध्यम आचेवर सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा. जास्त आचेवर तळल्यास वडे आतून कच्चे राहू शकतात. त्यामुळे खाताना पीठ पीठ लागू शकतं
गरमागरम साबुदाणा वडा दही, शेंगदाणा चटणी किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व्ह केल्यास चव अधिक वाढते.
साबुदाण्यातील अतिरिक्त पाणी पूर्णपणे निथळलेले असावे. तसेच मिश्रण जास्त मऊ होणार नाही याची काळजी घेतल्यास वडा अधिक कुरकुरीत होतो.