Shruti Vilas Kadam
सुरुवातीला डोळ्यांवर कन्सीलर किंवा आय प्रायमर लावा. यामुळे आयशॅडो जास्त वेळ टिकतो आणि क्रीज पडत नाही.
संपूर्ण पापणीवर हलका न्यूड किंवा स्किन टोन आयशॅडो लावा. यामुळे पुढील रंग नीट ब्लेंड होतात.
आयलिडवर काळा, गडद तपकिरी किंवा ग्रे रंग लावा. रंग जास्त न घेता हळूहळू लेयरिंग करा.
ब्लेंडिंग ब्रशने आयशॅडो बाहेरच्या बाजूने नीट पसरवा. स्मोकी लुकसाठी हार्श लाईन राहू देऊ नका.
वरच्या आणि खालच्या वॉटरलाईनवर काजळ लावा. आयलाइनर थोडा स्मज केल्यास लुक अधिक स्मोकी दिसतो.
खालच्या पापणीखाली थोडासा डार्क आयशॅडो लावून ब्रशने ब्लेंड करा. यामुळे डोळ्यांना खोली मिळते.
डोळ्यांवर भरदार मस्कारा लावा. हवं असल्यास खोट्या पापण्या लावून स्मोकी आय मेकअप पूर्ण करा.