Ruchika Jadhav
सध्या प्रत्येक व्यक्ती फक्त स्मार्टवॉच परिधान करणे पसंत करतात. जुन्या पद्धतीचे घड्याळ आजकाल कुणालाच आवडत नाहीत.
स्मार्ट वॉचमुळे आपल्याला वेळेसह आपल्या फोनमधील बरेच फिचर्स वापरता येतात.
यासह आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण, हृदयाचे ठोके, आपण दिवसातून किती पाऊले चालतो या सर्व गोष्टी यात मोजल्या जातात.
स्मार्ट वॉचमध्ये तुम्ही काही नोट्स बनवू शकता, यासह तुम्ही किती श्वास घेता. फोटोही काढू शकता.
मात्र स्मार्टवॉचचा सतत वापर केल्याने त्या व्यक्तीला डोकेदुखीच्या समस्या जानवतात.
स्मार्ट वॉचला असणाऱ्या रेजिएशनमुळे डोकेदुखीसह स्वभाव चिडचिडा बनतो.
अनेक जण स्मार्ट वॉच हातात घालून झोपतात. स्मार्ट वॉच फोनला कनेक्ट असल्यास सतत व्हायब्रेट होतं. त्यामुळे तुमची झोपमोड होऊ शकते.
स्मार्ट वॉच सतत वापरल्यास त्याने डोळ्यांवरील ताण देखील वाढू लागतो.