ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जर तुमच्याही फोनची बॅटरी लवकर संपत असेल या टिप्स वापरुन तुमच्या फोनची बॅटरीलाइफ वाढवू शकतो.
जास्त ब्राइटनेसमुळे बॅटरी लवकर संपते. यासाठी ऑटो ब्राइटनेस मोड ऑप्शन निवडा.
जेव्हा फोनची बॅटरी कमी असेल तेव्हा लो पॉवर मोड किंवा बॅटरी सेव्हर मोड ऑन करा. हे बॅकग्राउंडमध्ये चालणाऱ्या अॅपला मर्यादित करते.
जीपीएस, ब्लूटूथ आणि वाय फाय नेहमी चालू ठेवल्याने बॅटरी लवकर संपते. गरज नसल्यास ते बंद करा.
जर फोनची स्क्रीन जास्त वेळ चालू राहिली तर फोनची बॅटरी लवकर संपते. स्क्रीन टाइमआउट १५ किंवा ३० सेकंदावर सेट करा.
अनेक अॅप्स बॅकग्राउंडमध्ये चालू असतात यामुळे बॅटरी लवकर संपते.
सेटिंग्जमध्ये जाऊन बॅटरीवर क्लिक करुन बॅकग्राउंड अॅक्टिव्हिटीवर क्लिक करा आणि अनावश्यक अॅप बंद करा.