ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
ऐतिहासिक महत्व आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या अमरावती जिल्ह्यात फिरण्यासाठी अनेक शांत आणि सुंदर ठिकाण आहे.
समुद्रसपाटीपासून सुमारे १११८ मीटर उंचीवर वसलेले चिखलदरा हिल स्टेशन ढगांनी वेढलेले डोंगर, कोसळणारे धबधबे, नयनरम्ये दृश्ये, शांत अन् थंड वातावरणासाठी प्रसिद्ध आहे.
चिखलदरापासून काही अंतरावर हे प्रसिद्ध वन्यजील अभयारण्या आहे. येथे बंगाल वाघ, बिबट्या अस्वल, आणि असंख्य पक्ष्यांच्या प्रजातीचे घर आहे. येथे नक्की भेट द्या.
येथून तुम्ही निसर्गाच्या विहंगम दृश्याचे आनंद घेऊ शकता. येथून तुम्हाला सूर्योदय आणि सूर्यास्तचे नयनरम्य दृश्ये अनुभवयाला मिळेल.
ऐतिहासिक महत्व असलेल्या गाविलगड किल्ल्याला भेट द्यायला विसरु नका. या किल्ल्यावरुन तुम्हाला सातपुडा पर्वरांगाचे चित्तथरारक दृश्ये पाहायला मिळेल.
धुक्यांनी वेढलेले डोंगर, थंड वारा आणि शांत वातावरण निवांत वेळ घालवण्यासाठी हे एक परफेक्ट ठिकाण आहे.
घनदाट जंगलानी वेढलेले हे निर्गरम्य तलाव पिकनिकसाठी बेस्ट ठिकाण आहे. येथे तुम्ही बोटिंगचा आनंद देखील घेऊ शकता.