Dhanshri Shintre
पावसात स्मार्टफोन भिजल्यास तो बंद पडू शकतो, त्यामुळे वेळीच काळजी घेतल्यास नुकसान टाळता येते.
फोन ओला झाल्यास घाबरू नका, काही सोप्या आणि जलद ट्रिक्सचा वापर करून तुम्ही तुमचं डिव्हाइस पुन्हा कार्यरत करू शकता. जाणून घ्या उपाय.
सर्वात महत्त्वाचं पाऊल म्हणजे लगेचच फोन बंद करा. तो चालतोय का हे तपासण्याचा प्रयत्न केल्यास मोठं नुकसान होऊ शकतं.
फोन बंद झाल्यानंतर सिम, मायक्रोएसडी आणि काढता येणारी बॅटरी वेगळी करा, जेणेकरून हवा आत जाऊन शॉर्टसर्किटचा धोका कमी होईल.
फोन बाहेरून सावधपणे कोरडा करा. स्वच्छ, लिंट-फ्री कापड किंवा पेपर टॉवेलने आतील ओलसरपणा पुसा आणि संपूर्णपणे कोरडा करा.
फोन आतून सुकवणे ही सर्वात महत्त्वाची पायरी आहे. तांदळात ठेवू नका, कारण स्टार्च पोर्ट्समध्ये जाऊन नुकसान करू शकतो.
सिलिका जेल पॅकेट्स ही उत्तम पर्याय आहेत. फोन आणि पॅकेट्स हवाबंद कंटेनरमध्ये ठेवल्यास ओलावा कमी होऊन फोन सुरक्षित राहतो.
फोन किमान 48-72 तास कोरडा होऊ द्या. लवकर चालू केल्यास कायमचे नुकसान होऊ शकते, त्यामुळे संयम ठेवा.
फोन पूर्ण कोरडा झाल्यानंतर चालू करा. न चालल्यास थोडा वेळ चार्जरशी जोडून पाहा.