Shruti Vilas Kadam
फोनच्या USB/ Charging Port मध्ये ओलावा किंवा पाणी असल्यास Liquid Detected किंवा 'Moisture Detected असा अलर्ट दिसतो, हा फोनचे नुकसान टाळण्यासाठी दिला जाणारा सुरक्षा इशारा आहे.
अलर्ट दिसल्यास चार्जिंग करू नका, जबरदस्तीने चार्ज केल्यास चार्जिंग पोर्ट किंवा फोनच्या सर्किटचे नुकसान होऊ शकते. किवा छोटासा ब्लास्ट देखील होऊ शकतो.
फोन उभा चार्जिंग पोर्ट खालच्या दिशेने ठेवावा. फोन थोड्या उन्हात आणि हवेशीर अशा ठिकाणी राहूद्या. ऊन लागल्याने पाणी थोडेफार सुकू शकते.
फोन बंद केल्यानंतर सिम कार्ड आणि मेमरी कार्ड काढून टाका. यामुळे फोनमध्ये पाणी शिरले तरी सिम कार्ड आणि मेमरी कार्डचे नुकसान होत नाही.
हेअर ड्रायर वापरू नका.
फोन कडक उन्हात सुकण्यास ठेऊ नका.
चार्जिंग पोर्टमध्ये कापूस घालू नये.
फोन तांदळात ठेऊ नये, कारण तांदळाची धूळ चार्जिंग पोर्टमध्ये अडकण्याचा धोका असतो. त्यामुळे फोन आणखी खराब होऊ शकतो.
काही तासांनंतरही Liquid Detected अलर्ट दिसत असेल तर, आणखी काही उपाय न करता Service Centre मध्ये रिपेअर करून घ्या.
असे अलर्ट आल्यास फोन त्वरित Switch Off करा.
चार्जिंग पोर्ट खालच्या दिशेला ठेऊन ४ ते ५ तास हवेवर सुकवा.
अजिबात चार्जिंगला लाऊ नका.