Smartphone battery: या 7 कारणांमुळे तुमचा फोन होतोय अचानक स्लो

Surabhi Jayashree Jagdish

बॅकग्राऊंडमध्ये सुरू असलेले अॅप्स

फोन लॉक केल्यानंतरही अनेक अॅप्स बॅकग्राऊंडमध्ये सुरूच राहतात. ही अॅप्स सतत इंटरनेट, लोकेशन आणि इतर सेवा वापरत असल्यामुळे बॅटरीचा वापर वाढतो. त्यामुळे गरज नसलेले अॅप्स बंद ठेवणं फायदेशीर ठरतं.

Battery draining fast | saam tv

स्क्रीनचा ब्राइटनेस

फोनची स्क्रीन ही सर्वाधिक बॅटरी वापरणाऱ्या भागांपैकी एक आहे. ब्राइटनेस नेहमीच जास्त ठेवल्यास बॅटरी वेगाने कमी होतो. त्यामुळे ऑटो ब्राइटनेस वापरणं किंवा आवश्यकतेनुसार ब्राइटनेस कमी ठेवणं योग्य ठरतं.

Phone battery tips | saam tv

स्लो नेटवर्क सिग्नल

ज्या ठिकाणी मोबाईल नेटवर्क कमी असतं तिथे फोन सतत चांगला सिग्नल शोधण्याचा प्रयत्न करत राहतो. या प्रक्रियेत फोनची बॅटरी अधिक प्रमाणात खर्च होते. अशा ठिकाणी शक्य असल्यास Wi-Fi वापरणं किंवा गरज नसताना मोबाईल डेटा बंद ठेवणं उपयुक्त ठरू शकतं.

Battery saving tips | saam tv

ब्लूटूथ आणि Wi-Fi

ब्लूटूथ आणि Wi-Fi सतत सुरू असल्यास फोन जवळपास उपलब्ध डिव्हाइस किंवा नेटवर्क शोधत राहतो. यामुळे पार्श्वभूमीत सतत बॅटरीचा वापर होत राहतो.

iPhone battery | saam tv

जास्त वेळ गेमिंग करणं

मोबाईल गेम्स चालवताना प्रोसेसर, ग्राफिक्स आणि स्क्रीनवर मोठा ताण येतो. त्यामुळे गेमिंगदरम्यान बॅटरी वेगाने कमी होते. विशेषतः उच्च दर्जाचे ग्राफिक्स असलेले गेम खेळताना बॅटरीचा वापर आणखी वाढतो.

apps | saam tv

इंटरनेटचा सतत वापर

अनेक अॅप्स सतत इंटरनेटद्वारे डेटा अपडेट करत असतात. सोशल मीडिया, ई-मेल आणि मेसेजिंग अॅप्समुळेही बॅटरीचा वापर वाढतो. गरज नसताना इंटरनेट बंद ठेवले किंवा डेटा सिंकचा पर्याय मर्यादित केलं तर बॅटरी अधिक काळ टिकू शकते.

Battery optimization | saam tv

सेटिंग्जकडे दुर्लक्ष

फोनमधील अनेक सुविधा सतत सुरू ठेवल्यास त्याचा थेट परिणाम बॅटरीवर होतो. नियमितपणे फोनची सेटिंग्ज तपासणं आणि अनावश्यक फीचर्स बंद ठेवणं आवश्यक आहे.

Mobile battery life | saam tv

Heart attack symptoms: 1 महिना अगोदर ही 5 लक्षणं दिसली तर समजा हार्ट अटॅक येणारे!

Heart health | saam tv
येथे क्लिक करा