Protect Your Phone: सावधान! फक्त कॉल मेसेज नाही, आता स्क्रीनही हॅकर्सच्या रडारवर

Dhanshri Shintre

वैयक्तिक माहिती

जर हॅकर्सनी तुमच्या स्मार्टफोनमध्ये प्रवेश मिळवला, तर वैयक्तिक माहिती लीक होऊ शकते आणि बँक खातेही धोक्यात येऊ शकते, त्यामुळे मोबाईल सुरक्षित ठेवणे अत्यावश्यक आहे.

फोन हॅक

हजारो किलोमीटर दूर असलेला हॅकरही तुमच्या फोनची स्क्रीन रेकॉर्ड करून सर्व माहिती सहज पाहू शकतो, त्यामुळे सतर्क राहणे आवश्यक आहे.

गुप्त रेकॉर्डिंग

ऑनलाईन जगात विविध अॅप्स, सॉफ्टवेअर आणि बग उपलब्ध आहेत, ज्यांचा गैरवापर करून हॅकर्स किंवा शत्रू तुमच्या फोनची गुप्त रेकॉर्डिंग सहज करू शकतात.

खाजगी माहिती

अशा परिस्थितीत, हॅकर तुमची सर्व खाजगी माहिती सहज मिळवू शकतो आणि तुमच्या ओटीपीसह महत्त्वाच्या डेटावरही थेट प्रवेश मिळवू शकतो.

बँक खाते रिकामी करु शकतात

हॅकर्स ओटीपी आणि बँक डिटेल्स मिळवल्यानंतर तुमचे खाते रिकामे करू शकतात, त्यामुळे फोन स्क्रीन रेकॉर्डिंगपासून सावध राहणे आवश्यक ठरते.

अॅप्सचे आयकॉन

सामान्यतः स्क्रीन रेकॉर्डिंग सुरू झाल्यावर अॅप्सचे आयकॉन दिसतात, परंतु कुशल हॅकर फोन हॅक करून ही चिन्हे पूर्णपणे लपवू शकतो.

छोटा बिंदू

स्क्रीन रेकॉर्डिंगदरम्यान फोनवर एक छोटा बिंदू दिसतो; जर असा संकेत आढळला, तर तुमचा मोबाईल हॅक झाल्याची शक्यता असून त्वरित सतर्क व्हा.

अॅप्स अनइन्स्टॉल

फोनमध्ये स्क्रीन रेकॉर्डिंगची चिन्हे दिसल्यास, यूजर्सनी संशयास्पद अॅप्स किंवा सॉफ्टवेअर शोधून तात्काळ अनइंस्टॉल करावीत, अन्यथा वैयक्तिक माहिती धोक्यात येऊ शकते.

अ‍ॅप्स तपासा

मोबाईल सुरक्षित ठेवण्यासाठी वेळोवेळी इन्स्टॉल केलेली अ‍ॅप्स तपासा. कुठलेही अनोळखी किंवा संशयास्पद अ‍ॅप आढळल्यास त्वरित डिलीट किंवा ब्लॉक करणे गरजेचे आहे.

NEXT: फोनमध्ये कॉलिंग समस्या येत आहेत? 'या' टिप्स फॉलो करून पाहा

येथे क्लिक करा