Shreya Maskar
आजकालच्या डिजिटल युगात गोष्टी सेकंदात जरी होत असल्या तर सुरक्षिततेचा धोका निर्माण झाला आहे. मोबाईल, लॅपटॉपसोबतच तुमचा स्मार्ट टीव्ही देखील तुमच्या privacy ला धोका निर्माण करतो.
आजकाल स्मार्ट टीव्ही व्हॉइस कंट्रोल फीचर्स असलेल्या रिमोटसह येतात, जे तुमची संभाषणे शेअर करू शकतात.
स्मार्ट टीव्ही वापरताना यूजर्स अनेकदा रिमोटला व्हॉइस कमांडची परवानगी देतात, ज्यामुळे ओटीटी प्लॅटफॉर्मवर कंटेंट शोधणे सोपे होते. मात्र हे फीचर तुमची वैयक्तिक माहिती गूगल किंवा ॲमेझॉनच्या सर्व्हरवर पाठवू शकते.
स्मार्ट टीव्हीमध्ये लोकेशनची परवानगी देखील असते, जी सामान्यतः गूगल होम किंवा इतर ऑपरेटिंग सिस्टम ॲप्सद्वारे ॲक्सेस केली जाते. यामुळे तुमचे लोकेशन ऑनलाइन शेअर केले जाऊ शकते.
स्मार्ट टीव्ही जर तुम्ही वापरत नसाल तर तो बंद करा. टीव्ही बंद असताना, त्याचा रिमोट इंटरनेटशी कनेक्ट होत नाही, ज्यामुळे तुमची वैयक्तिक माहिती ऑनलाइन शेअर होण्यापासून वाचते.
स्मार्ट टीव्ही ॲप्सना लोकेशनची परवानगी देऊ नका. यामुळे तुमच्या घराचे लोकेशन कोणासोबतही शेअर होण्यापासून वाचेल.
आवश्यक नसल्यास, तुमच्या टीव्हीवर असे ॲप्स इन्स्टॉल करताना कोणतीही परवानगी देऊ नका, ज्यामुळे तुमची सुरक्षितता धोक्यात येईल.
टीव्ही चालू असताना कोणत्याही वैयक्तिक किंवा सार्वजनिक विषयावर बोलू नका. यामुळे स्मार्ट टीव्ही तुमची वैयक्तिक माहिती ऐकून ती ऑनलाइन शेअर करण्यापासून तुम्ही वाचाल.