ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मिक्सर जारची नियमित स्वच्छता केल्याने त्याचे आयुष्य वाढते आणि बॅक्टेरिया आणि दुर्गंधी देखील टाळता येते.
भांडे रिकामे केल्यानंतर, ते ताबडतोब कोमट पाण्याने धुवा जेणेकरून राहिलेले कण सहजपणे काढता येतील.
चिकटलेले कोणतेही कण काढण्यासाठी मीठ आणि कोमट पाणी वापरा.
मिक्सर जारच्या ब्लेड ह्या धारदार असल्यामुळे ब्लेडला साफ करण्यासाठी हाताचा वापर न करता ब्रशचा वापर करावा.
व्हिनेगर आणि बेकिंग सोड्याचे मिश्रण जार वरील असलेले डाग मुक्त करते आणि स्वच्छ ठेवते.
मिक्सर जारला सुकवण्यासाठी उलटे करुन ठेवा जेणेकरुन पाणी निघून जाईल आणि दुर्गंध सुध्दा येणार नाही.
प्रत्येक वापरानंतर जारचे झाकण पूर्णपणे स्वच्छ करुन ठेवा. तसेच, वेळोवेळी जारचे रबर गॅस्केट ही स्वच्छ करा आणि तपासा.
जर मिक्सर जारमध्ये दुर्गंध येत असेल तर, लिंबाच्या रसाचा वापर करुन करा.