Manasvi Choudhary
लग्नानंतर महिला मंगळसूत्र घालतात. विवाहित महिलांच्या दागिन्यांमध्ये मंगळसूत्राला विशेष महत्व आहे.
मंगळसूत्राच्या विविध डिझाईन्स आणि प्रकार आहेत. पूर्वी जड आणि लांब मंगळसूत्राचा ट्रेंड होता मात्र आता महिला छोटे आणि नाजूक दिसणारे मंगळसूत्र घालतात.
अत्यंत साधे आणि सिंपल असा हा पॅटर्न आहे. नाजूक चैनमध्ये काळे मनी आणि मध्यभागी एकच मोठा हिरा असतो.
आजकाल ट्रेडिंगमध्ये असलेले इन्फिनिटी आणि हार्ट शेपचे मंगळसूत्र तुम्ही निवडू शकता.
तुमच्या किंवा पतीच्या नावाचे पहिले अक्षर असलेले मंगळसूत्र तुम्ही खास बनवून घेऊ शकता.
वाईट नजरेपासून रक्षण करण्यासाठी वापरले जाणारे 'इव्हिल आय' मंगळसूत्र युनिक पॅटर्न आहे.
फुलांची नक्षी, त्रिकोण किंवा चौकोन अश्या आकारात असलेले मंगळसूत्र सध्या ट्रेडिंगमध्ये आहे.