Shreya Maskar
चांगली, शांत झोप लागण्यासाठी पायांमध्ये किंवा पायाखाली उशी ठेवून झोपा. अनेक लोकांना ही पद्धत आराम देते. विशेषतः गुडघे, कंबर, पायांवर ताण जाणवत असल्यास योग्य पद्धतीने उशी ठेवणे शरीराची पोझिशन सुधारण्यास मदत करू शकते.
पाठीवर झोपताना गुडघ्याखाली उशी ठेवल्यास कंबरेचा नैसर्गिक वक्र काही प्रमाणात आरामदायी स्थितीत राहण्यास मदत मिळते.
कुशीवर झोपणाऱ्यांनी दोन पायांच्यामध्ये उशी ठेवल्यास वरचा पाय पुढे ओढला जाणे कमी होऊन गुडघे आणि कंबर अधिक समांतर राहण्यास मदत होते.
दिवसभर उभे राहणे किंवा जास्त चालणे यामुळे पाय थकले असतील, तर पाय थोडे उंच ठेवणे काही लोकांना आरामदायी वाटू शकते.
पायाखाली उशी ठेवून पाय हृदयाच्या पातळीपेक्षा थोडे उंच ठेवणे पायाची सूज कमी होण्यास मदत मिळते.
पाठीवर झोपत असाल तर गुडघ्याखाली मध्यम उंचीची उशी ठेवा. कुशीवर झोपत असाल तर दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये उशी ठेवा.
चुकीची उशी वापरल्यास अस्वस्थता जाणवते. चुकीच्या पद्धतीने उशी ठेवल्यास रक्ताभिसरणाशी संबंधित त्रास होऊ शकतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.