Manasvi Choudhary
निरोगी आरोग्यासाठी पुरेशी झोप घेणे महत्वाचे आहे हे सर्वांनाच माहिती आहे. नियमितपणे ६ ते ७ तासांची झोप आवश्यक आहे.
परंतु, तुमच्या झोपण्याची स्थिती, झोपण्याच्या काही सवयींचा आरोग्यावर थेट परिणाम होत आहे.
अनेकांना रात्री तोंड उघडे ठेवून झोपण्याची सवय असते ज्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो.
तोंड उघडे ठेवून झोपणे म्हणजे तुम्ही तोंडातून श्वास घेता यामुळे तुमचे तोंड हे उघडे असते.
1) तोंडाने श्वास घेतल्यास तोंड कोरडे होते.
2) तोंड उघडे ठेवून झोपल्याने हृदयविकाराचा धोका उद्भवण्याची शक्यता असते.
3) तोंड उघडे ठेवून झोपल्याने तोंडावाटे शरीरात बॅक्टेरिया प्रवेश करतात.
4) तोंडाने श्वास घेतल्यास थंड आणि दूषित हवा थेट फुफ्फुसात जाते, ज्यामुळे घसा दुखणे, खोकला आणि टॉन्सिल्सचा त्रास होऊ शकतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.
NEXT: रात्री झोपताना ब्रा काढून का झोपावे? त्रास होण्यापूर्वी ही धक्कादायक माहिती वाचा