Manasvi Choudhary
महिलांच्या आरोग्यावर त्यांच्या नियमितच्या चुकीच्या सवयींचा परिणाम होत असतो.
ब्रा हा महिलांच्या अत्यंत महत्वाची आहे. मात्र ब्रा वापरताना महिलांनी योग्य काळजी घेणे देखील महत्वाचे आहे.
रात्री झोपताना ब्रा घालावे की नाही? असा मुलींना व महिलांना नेहमीच प्रश्न पडतो.
ब्रा घालून झोपावे की नाही हा संपूर्णत: प्रश्न महिलांच्या मनावर असतो. अनेक महिला ब्रा घालून झोपतात तर काही महिला रात्री ब्रा घालत नाही.
हेवी ब्रेस्ट असलेल्या महिला कंम्फर्टसाठी ब्रा घालतात यामुळे स्तनांना योग्य शेप मिळतो. बॉडीचा आकार बदलत नाही. मात्र ब्रा घालण्याचे जसे फायदे आहेत तसे तोटे देखील आहेत.
रात्री झोपताना ब्रा घालून झोपत असाल तर ती सैल असावी. घट्ट ब्रामुळे तुमच्या स्तनांवर परिणाम होतो.
घट्ट ब्रा घातल्याने स्तनांच्या ब्लड सर्क्युलेशनवर परिणाम होतो.
रात्री झोपताना तुम्ही ब्रा घालत असाल तर कॉटनची ब्रा वापरणे महत्वाचे आहे.
छातीत जळजळ, इन्फेक्शन व कोणत्याही समस्या होत असतील तर रात्री झोपताना ब्रा घालणे टाळावे.