Methi Ladoo Recipe: कडवटपणा निघून जाईल! मेथीच्या लाडूची ही रेसिपी नक्की ट्राय करा, घरातील लहान मुलेही मागून खातील

Manasvi Choudhary

मेथीचे लाडू

मेथीचे लाडू आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक म्हणून खाल्ले जातात. वर्षाच्या बाराही महिने या लाडूचे सेवन केले जाते.

Methi Ladoo Recipe

सोपी रेसिपी

मेथीचे लाडू बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. तुम्ही घरच्या घरी १० मिनिटांत हे लाडू बनवू शकता.

Methi Ladoo Recipe

साहित्य

लाडू बनवण्यासाठी मेथीचे दाणे, गव्हाचे पीठ, दूध, बदाम, डिंक, गूळ, तूप, सुंठ, वेलची पावडर हे साहित्य एकत्र घ्या.

Methi Ladoo Recipe

मेथीच्या दाण्यांची पावडर करा

सर्वातआधी मिक्सरच्या भांड्यात मेथीच्या दाण्यांची बारीक पावडर करा.

Methi Ladoo Recipe

पावडर भिजत घाला

नंतर दुसऱ्या एका भांड्यात दुधामध्ये बारीक केलेली पावडर रात्रभर भिजत घाला यामुळे मेथीचा कडवटपणा कमी होतो.

Methi Ladoo Recipe

तूपामध्ये मिश्रण मिक्स करा

त्यानंतर गॅसवर पॅनमध्ये गरम तूप घ्या त्यात भिजवलेल्या मेथीच्या दाण्याचे मिश्रण मिक्स करा आणि चांगले परतून घ्या.

Methi Ladoo Recipe

डिंकाची पावडर करा

नंतर एका ताटात हे मिश्रण थंड करा. पॅनमध्ये तूप टाकून डिंक तळून घ्या नंतर डिंकाची पावडर करा.

Methi Ladoo Recipe

गव्हाचे पीठ भाजून घ्या

पॅनमध्ये गव्हाचे पीठ चांगले भाजून घ्या नंतर यात मेथीचे मिश्रण आणि डिंक मिक्स करा.

Wheat flour | yandex

वेलची पावडर मिक्स करा

संपूर्ण मिश्रण चांगले एकजीव झाल्यास एका प्लेटमध्ये काढा. पॅनमध्ये गूळ घाला. गूळ वितळला की त्यात वेलची पावडर मिक्स करा.

Velchi Powder | GOOGLE

मेथीच्या दाण्याचे गोलाकार लाडू करा

संपूर्ण मिश्रण एकजीव करा आणि चांगले वाफवून घ्या. मिश्रण गरम असतानाचा त्याचे बारीक बारीक गोल लाडू वळून घ्या.

Methi Ladoo Recipe

NEXT: Hantavirus Symptoms: 'हंटा व्हायरस' म्हणजे काय? शरीरात कसा परसतो? 'ही' 5 लक्षणे दिसल्यास व्हा सावध

येथे क्लिक करा...