Saam Tv
दररोज झोप कमी होत असेल तर त्याचा परिणाम म्हणून शरीरात हानिकारक कोर्टिसोल हार्मोन वाढू लागतो.
६ तासांपेक्षा कमी झोपणाऱ्यांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका ४८% ने वाढतो. तसेच पक्षाघाताचा धोकाही अधिक असतो
अपुऱ्या झोपेमुळे शरीरातील इन्सुलिनची संवेदनशीलता कमी होते, ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढून मधुमेहाचा धोका तिपटीने वाढतो.
झोपेत आपले शरीर रक्तदाब नैसर्गिकरित्या नियंत्रित करते. झोप पूर्ण न झाल्यास रक्तवाहिन्यांवर ताण येऊन हायपरटेंशनची समस्या निर्माण होते
एक रात्र जरी झोप पूर्ण झाली नाही, तरी दुसऱ्या दिवशी लक्ष केंद्रित करणे अवघड जाते आणि स्मरणशक्ती घटते.
कमी झोपेमुळे सर्वात आधी घ्रेलिन हा भूक वाढवणारा हार्मोन वाढतो. घ्रेलिन वाढल्यामुळे वारंवार खाण्याची इच्छा होते आणि ओव्हरईटिंगची सवय लागते.
मानसिक थकव्यामुळे व्यक्ती छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडचिडी आणि आक्रमक बनते