Saam Tv
खरे पनीर पाण्यात ठेवल्यावर तळाला बसते, तर बनावट पनीर पाण्यावर तरंगू लागते.
खरे पनीर हाताने कुस्करले तर मऊ आणि थोडे तुटणारे असते, बनावट पनीर हाताला रबरासारखे लवचिक असते.
पनीरचे तुकडे उकळत्या पाण्यात ठेवल्यास बनावट पनीरचा रंग पिवळसर होऊ शकतो.
खऱ्या पनीरची चव नैसर्गिक आणि सौम्य असते, बनावट पनीर थोडे कडू किंवा रासायनिक चवीचे लागू शकते.
खरे पनीर तळताना हळूहळू सोनेरी होते, तर बनावट पनीर पटकन वितळते किंवा थेट जळते.
खरे पनीर दुधापासून बनते त्यामुळे पनीरला दुधाचा सौम्य वास येतो, बनावट पनीरला वेगळा किंवा कृत्रिम वास येतो
अतिशय स्वस्त पनीर खरे नसण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे विश्वासार्ह ब्रँड किंवा डेअरीमधूनच घ्या.