Shruti Vilas Kadam
अतिविचार, कामाचा ताण, चिंता किंवा नैराश्य यामुळे मेंदू शांत होत नाही. त्यामुळे झोप उशिरा लागते किंवा वारंवार जाग येते.
झोपण्यापूर्वी मोबाईल, टीव्ही किंवा लॅपटॉपचा जास्त वापर केल्याने ब्लू लाईट मेलाटोनिन हार्मोनचे उत्पादन कमी करते आणि झोपेवर परिणाम होतो.
संध्याकाळनंतर चहा, कॉफी, एनर्जी ड्रिंक किंवा कोल्ड ड्रिंकचे सेवन केल्यास झोप लागण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो.
दररोज एकाच वेळी झोपणे आणि उठणे ही सवय लावल्यास शरीराचे जैविक घड्याळ (Body Clock) व्यवस्थित राहते आणि झोपेची गुणवत्ता सुधारते.
रात्री उशिरा जड, तिखट किंवा तेलकट पदार्थ खाल्ल्यास अपचन होऊन झोपेचा त्रास वाढू शकतो. झोपण्यापूर्वी हलका आहार घ्यावा.
दररोज ३० मिनिटे चालणे, योगासने किंवा ध्यान केल्याने तणाव कमी होतो आणि रात्री शांत, गाढ झोप लागण्यास मदत होते.
आठवड्यातून अनेक दिवस झोप न लागणे, घोरणे, श्वास घेण्यास अडचण किंवा दिवसभर थकवा जाणवत असल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.