Shreya Maskar
रात्री झोपताना अनेकजण पंखा चालू ठेवतात. विशेषतः उकाड्याच्या दिवसांत पंख्यामुळे आराम मिळतो आणि झोप लागण्यास मदत होते. मात्र, पंख्याची हवा थेट अंगावर येते, ज्यामुळे अनेक समस्या उद्भवतात.
पंख्याची हवा सतत चेहऱ्यावर येत असल्यास डोळ्यांतील ओलावा कमी होतो, त्यामुळे डोळ्यांत जळजळ, खाज किंवा कोरडेपणा जाणवू शकतो.
सततच्या हवेच्या प्रवाहामुळे नाकातील ओलावा कमी होऊ शकतो. काही लोकांना नाक बंद होणे, घसा खवखवणे किंवा सकाळी शिंक येण्याचा त्रास जाणवू शकतो.
पंख्याच्या पात्यांवर साचलेली धूळ, तसेच खोलीतील कण आणि इतर ॲलर्जन्स हवेत पसरू शकतात. त्यामुळे शिंका, नाक वाहणे, खोकला किंवा डोळ्यांना खाज येऊ शकते.
पंख्याची हवा थेट चेहऱ्यावर येत असल्यास, विशेषतः तोंड उघडे ठेवून झोपण्याची सवय असल्यास, सकाळी तोंड कोरडे पडणे किंवा घसा खवखवणे जाणवू शकते.
ज्यांना धूळ किंवा इतर घटकांची ॲलर्जी आहे, त्यांच्यामध्ये पंख्यामुळे हवेत फिरणाऱ्या कणांच्या संपर्कात वाढ होऊ शकते. परिणामी दमा- श्वसनाचा त्रास वाढतो.
सततच्या हवेच्या प्रवाहामुळे त्वचेतील ओलावा कमी होऊ शकतो. विशेषतः आधीपासून कोरडी किंवा संवेदनशील त्वचा असलेल्या व्यक्तींना हा त्रास अधिक जाणवू शकतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.