Kitchen Ota Cleaning Trick : किचनचा ओटा स्वच्छ करण्याची स्मार्ट ट्रिक, तेलाचे हट्टी डाग अन् चिकटपणा चुटकीसरशी होईल गायब

Shreya Maskar

किचनचा ओटा

स्वयंपाकघरातील ओटा रोजच्या वापरामुळे तेलकट, चिकट होतो. त्यावर अन्नाचे डाग पडतात. अनेकदा साबण किंवा साधे पाणी वापरूनही ओटा पूर्णपणे स्वच्छ होत नाही. अशा वेळी काही सोप्या घरगुती उपायांचा वापर करावा.

Kitchen Ota | pinterest

डिशवॉश लिक्विड- कोमट पाणी

किचनच्या ओट्यावरील तेलकटपणा दूर करण्यासाठी कोमट पाण्यात काही थेंब डिशवॉश लिक्विड मिसळा. या मिश्रणात मऊ कापड बुडवून ते पिळून घ्या आणि ओटा पुसून घ्या. त्यानंतर स्वच्छ ओल्या कापडाने पुसून कोरडे करा.

Dishwashing liquid - warm water | pinterest

हट्टी डाग

ओट्यावर अन्नाचे डाग सुकले असतील, तर त्या जागेवर कोमट पाण्यात भिजवलेले कापड काही मिनिटे ठेवा. डाग मऊ झाल्यावर मऊ स्पंजने हलक्या हाताने स्वच्छ करा.

Stubborn spots | pinterest

ओट्यावरील चिकटपणा

स्वयंपाक करताना तेलाचे थेंब उडून ओटा चिकट होतो. अशा वेळी डिशवॉश लिक्विडचे सौम्य मिश्रण वापरून ओटा पुसा. स्वच्छतेनंतर पाण्याचे अवशेष राहू देऊ नका.

Kitchen Ota | pinterest

किचनचा ओटा रोज स्वच्छ कसा ठेवावा?

स्वयंपाक झाल्यानंतर ओटा लगेच पुसण्याची सवय लावा. तेलाचे डाग आणि अन्नाचे कण सुकण्यापूर्वी स्वच्छ केल्यास ओटा घासण्याची मेहनत कमी होते.

kitchen floor | pinterest

ओटा चमकवण्याची ट्रिक

ओटा पूर्ण कोरडा झाल्यावर त्यावर थेंबभर खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह ऑइल लावून कापसाने पुसल्यास ओटा नवीनसारखा चकाकतो.

trick to brightening up | pinterest

'या' गोष्टी लक्षात ठेवा

ग्रॅनाइटचा ओटा स्वच्छ करण्यासाठी सौम्य साबण आणि मऊ कापड वापरा. आम्लयुक्त क्लीनर टाळा. ओटा स्वच्छ पाण्याने पुसून कोरड्या कापडाने पुसा.

Remember 'these' things | pinterest

मार्बलचा ओटा

मार्बलचा ओटा स्वच्छ करण्यासाठी लिंबाचा रस, व्हिनेगर आणि आम्लयुक्त क्लीनर वापरू नका. यामुळे पृष्ठभाग खराब होऊ शकतो.

A piece of marble | pinterest

NEXT : गरबा नाइटसाठी रॉयल लूक! घागरा चोळीवर ट्राय करा कंबरपट्टाचे 'हे' ७ सुंदर डिझाइन्स

Navratri Kamarband Designs | AI PHOTOS
येथे क्लिक करा...