ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
झोप पूर्ण न झाल्याने किंवा रात्री उशीरा झोपल्याने शरीरावर काय परिणाम होतो. जाणून घ्या.
झोपेच्या कमतरतेमुळे शरीर थकल्यासारखे वाटते. यामुळे कोणत्याही कामासाठी उर्जा राहत नाही.
झोपेच्या कमतरतेमुळे मनात चिडचिड आणि अस्वस्थता कायम राहते. तसेच कामावर लक्ष केंद्रित करणे कठीण होते.
झोप पूर्ण झाल्यामुळे त्वचेवर परिणाम होतो. आणि त्वचा वेळेआधीच निस्तेज होते.
सतत झोपेचा अभाव राहिल्यास याचा शरीरावर परिणाम होऊन वजन वाढू शकते.
झोप पूर्ण न झाल्याने रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊ लागते.
हेल्दी लाइफस्टाइलसाठी वेळेवर झोपणे महत्वाचे आहे. यामुळे अनेक आजार टाळता येतात.