ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादव याचा वंशिका नावाच्या मुलीसोबत साखरपुडा पार पडला. आता लवकरच तो लग्नबंधनात अडकणार आहे. परंतु कोण आहे वंशिका, जाणून घ्या.
कुलदीप यादव आणि वंशिकाचा साखरपुडा उत्तरप्रदेशमधील लखनऊमध्ये पार पडला.
कुलदीपने अचानक साखरपुडा उरकत आपल्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. परंतु ही खास मुलगी अजून कोणी नसून वंशिका आहे. ही कुलदीपची बालपणीची मैत्रीण आहे.
वंशिका सध्या एलआयसीमध्ये काम करते. वंशिका ही कानपूरची रहिवासी आहे.
या साखपुड्याला रिंकू सिंगसह अनेक भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूंनी हजेरी लावली.
कुलदीप यादवचा जन्म १४ डिसेंबर १९९४ रोजी उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यात झाला. या उत्कृष्ट फिरकी गोलंदाजाने टीम इंडियासाठी खूप चांगली कामगिरी केली आहे.
जून महिन्यात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दोन्ही संघामध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. यावेळी कुलदीप यादवला भारतीय संघात स्थान मिळाले आहे.