ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
फळं खाणं आरोग्यासाठी फायदेशीर असते. परंतु काही फळं खाणं आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकतं. परंतु द्राक्ष खाल्ल्याने साखरेची पातळी वाढते का, जाणून घ्या.
मधुमेह रुग्णांसाठी द्राक्ष खाणं फायदेशीर आहे. द्राक्षामध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त असते म्हणून अतिप्रमाणात द्राक्ष खाणं धोकादायक ठरु शकतं.
मधुमेही रुग्णांनी १० ते १२ द्राक्षांचेच सेवन केले पाहिजे. यापेक्षा जास्त द्राक्ष खाऊ नयेत.
द्राक्षामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी असते.
तुम्ही अन्य खाद्य पदार्थांसोबत द्राक्षाचे सेवन करु शकता. प्रोटीनयुक्त पदार्थांसोबत द्राक्ष खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते.
द्राक्षांमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात. जे शरीरातील पेशींचे नुकसान होण्यापासून वाचवतात.
द्राक्षांमध्ये व्हिटॅमिन, मिनरल्स आणि फायबर असतात. जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात.