Shruti Vilas Kadam
०–३ महिन्याचे नवजात बालकं १४–१७ तास झोपतात. ४–१२ महिन्याची लहान बाळं १२–१६ तास झोपतात. टॉड्लर्स म्हणजे १–२ वर्षांची मुलं ११–१४ तास झोपतात. पूर्व-शालेय म्हणजे ३–५ वयातील मुलं १०–१३ तास झोपतात.
शालेय वयातील मुलांसाठी दररोज ९ ते १२ तास झोपण्याची शिफारस आहे. या वयात शरीर आणि मेंदूच्या विकासासाठी पुरेशी झोप महत्त्वाची ठरते.
१३ ते १७ वर्षांच्या किशोरवयीन मुलांनी दररोज ८ ते १० तास झोप घेणे आवश्यक आहे. अभ्यास, वाढ आणि दैनंदिन आरोग्यासाठी पुरेशी झोप महत्त्वाची आहे.
१८ ते ६० वर्षे वयोगटातील प्रौढांनी दररोज किमान ७ तास झोप घेणे आवश्यक आहे. त्यामुळे नियमितपणे फक्त ६ तास झोपणे सर्वांसाठी पुरेसे ठरेलच असे नाही.
या वयोगटातील व्यक्तींना दररोज ७ किंवा त्यापेक्षा अधिक तास झोप घ्यावी. झोपेचा कालावधी आणि तिची गुणवत्ता दोन्ही महत्त्वाची आहेत. झोपेत सारखी जाग येत असेल तर झोप नीट पूर्ण होतं नाही.
या वयोगटातील व्यक्तींनी साधारणपणे ७ ते ९ तास झोप घेणे योग्य आहे. नियमित आणि पुरेशी झोप शरीराला आराम मिळण्यास मदत करते.
ज्येष्ठ नागरिकांसाठी दररोज ७ ते ८ तासांची झोप घ्यावी. वय वाढल्यानुसार झोपेची गरज काही प्रमाणात बदलते.
नियमितपणे ७ तासांपेक्षा कमी झोप घेतल्यास आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. कमी झोपेचा संबंध लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आणि हृदयविकारासारख्या समस्यांशी जोडला गेला आहे