Shruti Vilas Kadam
सकाळचा नाश्ता टाळल्याने शरीराचा मेटाबॉलिझम मंदावू शकतो. त्यामुळे शरीर कमी कॅलरी बर्न करते आणि वजन कमी होण्याऐवजी वाढण्याची शक्यता निर्माण होते.
नाश्ता न केल्यामुळे दिवसभर भूक जास्त लागते. त्यामुळे दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात जास्त खाल्ले जाते, ज्याचा परिणाम वजनावर होतो.
सकाळी शरीराला आवश्यक एनर्जी मिळाली नाही तर थकवा, विकनेस आणि आळस जाणवू शकतो. त्यामुळे दैनंदिन कामांवर आणि उत्पादकतेवर परिणाम होतो.
नाश्ता टाळणाऱ्या लोकांमध्ये जंक फूड किंवा गोड पदार्थ खाण्याची इच्छा अधिक वाढू शकते. यामुळे अनहेल्दी खाण्याची सवय लागण्याचा धोका वाढतो.
खूप दिवस नाश्ता टाळल्यास पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो. अॅसिडिटी, गॅस आणि पोट फुगणे यांसारख्या समस्या वाढण्याची शक्यता असते.
शरीराला आवश्यक पोषण वेळेवर न मिळाल्यास रक्तातील साखर असंतुलित होऊ शकते. त्यामुळे चक्कर येणे किंवा डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.
वजन कमी करण्यासाठी नाश्ता टाळण्याऐवजी प्रोटीन, फायबर आणि हेल्दी फॅट्सयुक्त संतुलित नाश्ता करणे अधिक फायदेशीर मानले जाते.