Shruti Vilas Kadam
स्कीपिंग हा उत्तम कार्डिओ व्यायाम मानला जातो. नियमित स्कीपिंग केल्याने कॅलरी बर्न होऊन वजन कमी होण्यास मदत मिळते.
स्कीपिंगमुळे रक्ताभिसरण सुधारते आणि हृदय अधिक सक्रिय राहते. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते.
दररोज स्कीपिंग केल्याने शरीराची सहनशक्ती आणि स्टॅमिना वाढतो. त्यामुळे थकवा कमी जाणवतो आणि शरीर अधिक ऊर्जावान राहते.
स्कीपिंग करताना पाय, हात आणि कोअर स्नायूंवर ताण येतो. त्यामुळे स्नायू मजबूत होण्यास मदत मिळते.
व्यायामामुळे एंडॉर्फिन हार्मोन तयार होतो, ज्यामुळे मूड सुधारतो आणि मानसिक तणाव कमी होण्यास मदत होते.
स्कीपिंगमुळे शरीराचा बॅलन्स सुधारतो. तसेच शरीर अधिक लवचिक आणि सक्रिय राहण्यास मदत मिळते.
सुरुवातीला ५ ते १० मिनिटे स्कीपिंग करा. हळूहळू वेळ वाढवत २० ते ३० मिनिटांपर्यंत स्कीपिंग केल्यास अधिक फायदे मिळू शकतात.