Pani Puri Receipe: नेहमीचं चटपटीत पाणी सोडा, पाणीपुरीसाठी ५ मिनिटांत बनवा स्ट्रीट स्टाईल झणझणीत पाणी

Surabhi Jayashree Jagdish

तिखट पाणी

घरी पाणीपुरीचं पाणी करायचं म्हटलं की, मसाले बनवणं किंवा मोठी तयारी करण्याची गरज नाही. आता एका वेगळ्या आणि हटक्या पद्धतीने अगदी ५ मिनिटांत अगदी बाजारासारखं चविष्ट तिखट पाणी कसं बनवायचं हे पाहूयात.

पुदिना आणि कोथिंबीर

एका वाटी पुदिना आणि एक वाटी कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्या. दोन्ही एकत्र थोडेसे चिरून घ्या. यामुळे पाणी एकसंध हिरवे आणि चवदार होते.

हिरव्या मिरच्या आणि आले

२ हिरव्या मिरच्या आणि ½ इंच आलं घ्या. हे तिखटपणा आणि सुगंध वाढवतात. जास्त तिखट हवं असेल तर मिरच्या प्रमाण वाढवा.

लिंबाचा रस किंवा चिंच पाणी

अर्ध्या लिंबाचा रस घाला किंवा एक चमचा चिंचेचं गुळवट पाणी वापरा. याने पाणी आंबट-तिखट संतुलित लागते. चिंच वापरलं तर रस्त्यावरच्या पाण्यासारखी चव येते.

बारीक करा

सगळं मिक्सरमध्ये जरा बारीक फिरवून स्वच्छ गाळा. यामुळे पाणी हलकं, स्वच्छ आणि प्यायला मस्त लागतं.

थंड पाणी

अर्धा लिटर थंड किंवा बर्फाचं पाणी घाला. थंड पाण्याने तिखट-आंबट चव येते. गरम पाणी वापरू नका, नाहीतर चव वेगळी लागते.

सर्व्ह करा

बर्फाचे तुकडे घालून लगेच सर्व्ह करा. जास्त वेळ ठेवल्यास चव कमी होते. हवं असल्यास चिमूटभर चाट मसाला वरून घाला.

Bhakri Tips: ज्वारीची भाकरी थंड झाल्यावर कडक होतेय? 'या' सोप्या टीप्सने भाकरी होईल अगदी कापसासारखी लुसलुशीत

Bhakri Tips | saam tv
येथे क्लिक करा