Sakshi Sunil Jadhav
महाराष्ट्रात अशी अनेक लपलेली ठिकाणं आहेत जी पर्यटकांना अद्याप माहित नाही.
तुम्हाला इथे नैसर्गिक सौंदर्य, लॅंडस्केप आणि विश्रांतीसाठी अनेक ठिकाणं One Day मध्ये पाहता येऊ शकतात.
विदर्भातले सगळ्यात सुंदर हिल स्टेशन चिखलदरा पावसाळ्यात एक भन्नाट पर्यटन ठिकाण ठरेल.
सातपुड्यांचे शांत पठार हे १,१५० मीटर उंचीवर वसलेले आहे.
तोरमाळजवळ तुम्हाला गोरक्षनाथ मंदिर, एक भव्य तीर्थस्थळ, कमळाच्या फुलांचे तलाव तुम्हाला पाहायला मिळेल.
माळशेज घाटातले सुंदर धबधबे सगळ्या पर्यटकांना पावसाळ्यात आकर्षित करतात.
पालघर जिल्ह्यात वसलेले जव्हार हे ठिकाण ५१८ मीटर उंचीवर आहे.
सह्याद्रीपासून सुमारे ६९० मीटर उंचीवर असलेले आंबोली घाट हे ठिकाण आहे.
ऐतिहासिक वारसा लाभलेला हा पन्हाळा किल्ला पावसाळ्यात सगळ्यात सुंदर आणि भव्य आहे.