ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मेकअप काढल्यानंतर त्वचेची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. या स्टेप्स वापरुन तुम्ही तुमच्या त्वचेला निरोगी ठेवू शकता.
क्लिंजिंग ऑईल किंवा मेकअप रिमूव्हरने चेहऱ्याला चांगले स्वच्छ करुन घ्या जेणेकरुन सगळा मेकअप निघून जाईल.
कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या आणि मऊ कापडाने चेहरा हलक्या हाताने पुसून घ्या.
टोनर चा वापर करुन त्वचेतील PH संतुलन तसेच ठेवा आणि छिद्रांना भरुन काढा.
त्वचेला खोलवर पोषण देणारे आणि मॉइश्चराइझ करणारे सीरम लावा.
डोळ्यांभोवतीच्या नाजूक त्वचेवर आय क्रीम लावा आणि संपूर्ण चेहऱ्याला मॉइश्चराइझ करा.
ओठांच्या देखभालीसाठी आणि मुलायम ठेवण्यासाठी लीप बामचा वापर करा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.