ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
कुंकू लावणे हे विवाहित महिलांचे प्रतिक मानले जाते. तसेच भारतात महिलांनी कुंकू लावणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. पण तुम्हाला माहिती आहे का केसात कुंकू लावल्याने काय नुकसान होते.
आपल्या हिंदू धर्मात देवतांना कुंकू अर्पण केले जाते आणि विवाहित स्त्रिया आपल्या भांगातही ते लावतात. कुंकवाशिवाय विवाहित स्त्रीचा शृंगार अपूर्ण मानला जातो.
ज्या महिला रोज भांगामध्ये कुंकू लावतात, त्यांचा केसांसाठी सतत कुंकू लावणे नुकसानदायक आहे. कुंकू हे अनेक केमिकल मिसळून बनवले जाते जे केसांना मुळांनपासून कमजोर करतात.
कुंकवामध्ये असलेले मर्क्युरिक सल्फाइड केस गळण्यास प्रोत्साहन देते. त्यात लेड सारखी अनेक केमिकल देखील असतात, जी केसांच्या मुळांना कमकुवत करतात.
अनेक स्त्रिया आपल्या केसांच्या भांगावर कुंकवाची लांब रेषा लावतात. त्यांना स्कॅल्पची ॲलर्जी होण्याचा धोका असतो, ज्यामुळे स्कॅल्पवर पुरळ किंवा खाज येऊ शकते.
स्वस्त आणि केमीकल युक्त कुंकू लावल्याने केस पांढरे पडण्यास सुरुवात होते आणि केसांचे पोषण कमी होते.
काही स्त्रिया आपल्या कपाळावर कुंकू लावतात आणि त्यानेच केसांची भांग पाडतात. हे त्यांच्या त्वचेसाठी धोकादायक ठरू शकते. रासायनिक घटकांवर आधारित कुंकवामुळे कर्करोग आणि इतर आजार होऊ शकतात.
भांगेत जाड, केमीकल पदार्थयुक्त कुंकू लावल्याने कोंडा किंवा केस कमकुवत होऊ शकतात. यामुळे त्वचेवर पुरळ आणि लालसरपणा देखील येऊ शकतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.