ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मार्गशीष मधील गुरुवार तसेच येणारा मकर संक्रांतीचा सण या काळात महिलांच्या घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला जातो.सर्व महिला एकत्र जमून ही हळदी कुंकवाची परंपरा पार पडतात. प्रश्न येतो तो म्हणजे वाण काय द्यायचे. तर मग जाणून घ्या बजेट फ्रेंडली आणि उपयुक्त विविध असे वाण.
हळद कुंकू, सुपारी व नारळ हे शुभतेचे प्रतीक मानले जाते.आजही हे वाण महिलांना आवडते आणि परंपरेला जपते.
स्वयंपाकघरात रोज वापरात येणाऱ्या या गोष्टी आहेत. टिकाऊ, उपयुक्त आणि सर्व वयोगटातील महिलांसाठी हे वाण देण्यास योग्य आहे.
मेणबत्ती लावल्यास घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते. पूजा, सण आणि डेकोरेशनसाठी महिला मेणबत्तीचा वापर मोठ्या प्रमाणात करतात.
बांगड्या टिकली सेट या सर्व गोष्टी महिलांच्या आवडीच्या आहेत. हळदी कुंकवासाठी खास महिलांचे आवडते वाण म्हणून देण्यात येते. सणासुदीला लगेच या गोष्टींचा वापर करता येतो.
हे एक इको-फ्रेंडली वाण आहे. ज्यांना घरात छोट्या बागेची आवड असते त्यांना हे वाण देणे उपयुक्त ठरते. घरात हिरवळ वाढते आणि निसर्गाशी नातं जोडलं जाते.
आजकाल घराघरात चहा आणि कॉफी पिण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. लेमन टी, ग्रीन टी, मसाला चहा असे वेगवेगळे फ्लेवर्स बाजारात उपलब्ध आहेत.हे आजच्या काळातील मॉडर्न आणि उपयोगी वाण आहे.
सगळ्या महिलांना उपयोात येणारे वाण द्यावे. तसेच बजेटमध्ये बसणारे असावे आणि सर्व वयोगटांना आवडेल असे असावे.