Shruti Vilas Kadam
एका वाटीत १ मोठा चमचा बेसन, १ ते २ मोठे चमचे दूध आणि चिमूटभर हळद घ्या. हे मिश्रण एकत्र करून चेहऱ्यावर लावा. १० ते १५ मिनिटांनी पाण्याने हलक्या हाताने धुवा.
बेसनामुळे त्वचेवरील अतिरिक्त तेल आणि घाण स्वच्छ करण्यास मदत होते. त्यामुळे चेहरा स्वच्छ आणि ताजातवाना वाटू शकतो.
दुधामध्ये त्वचा मऊ होते. बेसन आणि दुधाचा फेस पॅक लावल्यानंतर त्वचा मऊ आणि मुलायम वाटू शकते.
चेहरा निस्तेज दिसत असेल तर, हा फेस पॅक त्वचा स्वच्छ ठेवण्यास मदत करतो. त्यामुळे चेहऱ्यावर नॅचरल ग्लो येतो.
बेसनामुळे त्वचेवरील घाण आणि डेड सेल कमी होतात. यासाठी हलक्या हाताने फेस पॅक धुताना चेहऱ्याला २ मिनिटं मसाज द्यावा.
दुधामुळे त्वचा मऊ वाटू शकते. त्वचा जास्तचं कोरडी असेल, तर फेस पॅक धुतल्यानंतर मॉइश्चरायझर लावणे महत्त्वाचे आहे.
हळदीमध्ये कर्क्युमिनसारखे अँटिऑक्सिडंट जळजळ कमी करण्याचे काम करतात. मात्र, हळद लावल्याने पिंपल्स किंवा डाग दूर होतात.