Skin Care: चेहऱ्यावरचा डलनेस कमी करुन ग्लोईंग स्किन पाहिजे? मग हा घरगुती स्क्रब नक्की वापर

Shruti Vilas Kadam

स्क्रब तयार करण्याची आणि वापरण्याची पद्धत

1 चमचा तांदळाची पावडर घ्या. त्यात 1 चमचा बेसन मिसळा. 1 चमचा बीटचा रस आणि 1 चमचा नारळ तेल घाला. सर्व मिश्रण एकजीव करून चेहरा किंवा त्वचेवर हलक्या हाताने 2-3 मिनिटे मसाज करा. 10 मिनिटे तसेच ठेवून कोमट पाण्याने धुवा. आठवड्यातून 1 ते 2 वेळा वापरल्यास चांगले परिणाम मिळू शकतात.

Skin Care | Pintrest

मृत त्वचा काढून टाकण्यास मदत

तांदळाची भरड पावडर नैसर्गिक एक्सफोलिएटर म्हणून काम करते. ती त्वचेवरील मृत पेशी काढून त्वचा स्वच्छ आणि तजेलदार बनवण्यास मदत करते.

Skin Care | Saam TV

त्वचेला नैसर्गिक चमक मिळते

बीटमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि पोषक घटक त्वचेचा निस्तेजपणा कमी करून नैसर्गिक ग्लो वाढवण्यास मदत करतात.

Skin Care Tips

त्वचा मऊ आणि मुलायम बनते

नारळ तेल त्वचेला खोलवर मॉइश्चरायझ करते. त्यामुळे त्वचेतील कोरडेपणा कमी होऊन ती अधिक मऊ आणि नितळ दिसते.

Face care | Saam TV

अतिरिक्त तेल आणि घाण साफ होते

बेसन त्वचेवरील अतिरिक्त तेल, धूळ आणि घाण साफ करण्यास मदत करते. त्यामुळे त्वचा अधिक स्वच्छ आणि ताजीतवानी वाटते.

Face Care

टॅनिंग कमी करण्यास मदत

या स्क्रबचा नियमित वापर केल्यास सूर्यप्रकाशामुळे झालेली टॅनिंग कमी होण्यास मदत मिळू शकते आणि त्वचेचा रंग अधिक समसमान दिसू शकतो.

Face Care | Saam Tv

त्वचेची पोत सुधारते

स्क्रबिंगमुळे रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते. यामुळे त्वचेची पोत सुधारते आणि चेहरा अधिक निरोगी दिसू शकतो.

Face Care | Saam Tv

Monsoon Picnic Spot: पावसाळ्यात महाराष्ट्रातल्या या ७ बेस्ट ठिकाणी नक्की करा फिरायला जायचा प्लॅन

Monsoon Picnic Spot
येथे क्लिक करा