Shruti Vilas Kadam
स्टीममुळे त्वचेतील पोअर्स उघडतात. त्यामुळे धूळ, माती, तेलकटपणा आणि मेकअपचे अवशेष सहज बाहेर निघतात व त्वचा स्वच्छ दिसते.
नियमित स्टीम घेतल्याने ब्लॅकहेड्स व व्हाइटहेड्स सैल होतात. त्यामुळे ते सहज निघतात आणि नव्याने होण्याचं प्रमाणही कमी होतं.
स्टीममुळे चेहऱ्यावर रक्तप्रवाह वाढतो. यामुळे त्वचेला नैसर्गिक गुलाबी तेज येतं आणि त्वचा अधिक फ्रेश दिसते.
स्टीममुळे त्वचेत ओलावा टिकून राहण्यास मदत होते. कोरडी, रफ त्वचा मऊ आणि स्मूथ होण्यास उपयोगी ठरते.
छिद्रं स्वच्छ झाल्यामुळे तेल आणि जंतू साचत नाहीत. परिणामी पिंपल्सची समस्या हळूहळू कमी होण्यास मदत मिळते.
स्टीमनंतर लावलेले सीरम, मॉइश्चरायझर किंवा फेस पॅक त्वचेत अधिक चांगल्या प्रकारे शोषले जातात आणि त्यांचा परिणाम लवकर दिसतो.
दररोज फक्त ५ मिनिटे स्टीम घेतल्याने त्वचा डीटॉक्स होते. त्यामुळे चेहरा अधिक उजळ, तजेलदार आणि हेल्दी दिसतो.