Shruti Vilas Kadam
पिकलेली पपई मॅश करून त्यात १-२ चमचे बेसन मिसळा. चेहऱ्यावर लावा, १५-२० मिनिटांनी कोमट पाण्याने धुवा.
हा फेस पॅक त्वचेवरील मृत पेशी काढून टाकतो आणि त्वचा फ्रेश व स्वच्छ दिसते.
बेसन त्वचेतील अतिरिक्त तेल नियंत्रित करतो, त्यामुळे पिंपल्स कमी होण्यास मदत होते.
पपई आणि बेसनचा वापर केल्याने सन टॅन कमी होऊन त्वचा उजळ दिसते.
हा फेस पॅक त्वचेला पोषण देऊन ती मऊ आणि स्मूथ बनवतो.
पपईतील एन्झाइम्स आणि बेसन त्वचेला आतून स्वच्छ करून नैसर्गिक चमक आणतात.
आठवड्यातून २ वेळा हा फेस पॅक वापरल्यास त्वचेवर चांगले परिणाम दिसून येतात.