Skin Care: चेहऱ्यावर हवा इंस्टंट ग्लो आणि थंडावा? घरच्या घरी तयार करा 'हा' फेसपॅक; २० मिनिटांत दिसेल फरक!

Shruti Vilas Kadam

फेसपॅक असा तयार करा

एका चमच्यात ताजे कोरफड जेल घ्या. त्यामध्ये तुरटीची अगदी बारीक चिमूट मिसळा. हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून चेहऱ्यावर पातळ थर लावा.

Skin Care | Saam TV

त्वचेला थंडावा मिळण्यास मदत

कोरफडीमध्ये त्वचेला शांत आणि हायड्रेट ठेवण्यास मदत करणारे गुणधर्म असतात. उन्हामुळे त्वचेवर जाणवणारी जळजळ किंवा उष्णता कमी करण्यासाठी कोरफड उपयुक्त ठरू शकते.

Skin Care | Pintrest

अतिरिक्त तेलकटपणा कमी करण्यास मदत

तुरटीचा वापर पारंपरिकरित्या त्वचेवरील अतिरिक्त तेल आणि घाम कमी करण्यासाठी केला जातो. त्यामुळे तेलकट त्वचा असणाऱ्यांना हा पॅक काही प्रमाणात फायदेशीर वाटू शकतो.

Face Care

त्वचा स्वच्छ दिसण्यास मदत

कोरफड आणि तुरटीचा पॅक त्वचेवरील अतिरिक्त तेलकटपणा कमी करून चेहरा स्वच्छ आणि फ्रेश दिसण्यास मदत करू शकतो. त्यामुळे चेहऱ्यावर ग्लो येतो.

face Care | Saam Tv

तुरटीचे प्रमाण कमी ठेवा

तुरटी थेट चेहऱ्यावर किंवा मोठ्या प्रमाणात वापरू नका. कोरफड जेलमध्ये अगदी थोडी तुरटी मिसळून पातळ पेस्ट तयार करा. संवेदनशील त्वचा असल्यास तुरटी टाळणे चांगले.

Face Care | Saam Tv

किती वेळ ठेवावे?

हा पॅक सुरुवातीला ५ ते १० मिनिटांपेक्षा जास्त ठेवू नका. त्यानंतर साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा आणि त्वचेला मॉइश्चरायझर लावा. आठवड्यातून एकदाच वापरणे पुरेसे आहे.

Face Care | Saam Tv

पॅच टेस्ट करणे महत्त्वाचे

तुरटीमुळे काही जणांच्या त्वचेवर कोरडेपणा, जळजळ किंवा लालसरपणा होऊ शकतो. त्यामुळे वापरण्यापूर्वी हाताच्या आतील बाजूवर किंवा त्वचेच्या छोट्या भागावर पॅच टेस्ट करा. जळजळ झाल्यास वापर बंद करा.

Face Care | Saam tv

Cotton Trendy Saree: सणासुदीला दिसा स्टायलिश अन् कम्फर्टेबल; कॉटन साडीचे 'हे' 7 डिझाइन्स ठरतील परफेक्ट

Gauri Alankar | Saam Tv
येथे क्लिक करा