Shruti Vilas Kadam
फुलांच्या प्रिंटची कॉटन साडी सध्या ट्रेंडमध्ये आहे. नाजूक फ्लोरल डिझाइन आणि सुंदर रंगसंगतीमुळे ही साडी डेली वेअर तसेच छोट्या कार्यक्रमांसाठीही छान दिसते.
पारंपरिक ब्लॉक प्रिंटला मॉडर्न रंगांची जोड दिलेली कॉटन साडी स्टायलिश लूक देते. ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी आणि साध्या ब्लाउजसोबत हा लूक अधिक खुलतो.
उभ्या किंवा आडव्या पट्ट्यांचे डिझाइन कॉटन साडीला स्मार्ट आणि एलिगंट लूक देते. ऑफिसमध्ये किंवा कॅज्युअल आउटिंगसाठी हा प्रकार सहज कॅरी करता येतो.
चेक्स पॅटर्न पुन्हा एकदा फॅशनमध्ये आला आहे. कॉटनच्या साडीवरील रंगीत किंवा साध्या चेक्समुळे पारंपरिक आणि मॉडर्न स्टाइलचा सुंदर मेळ साधता येतो.
साधी कॉटन साडी आणि त्यावर कॉन्ट्रास्ट बॉर्डर असा ट्रेंड सध्या पसंत केला जातो. कमी दागिने आणि स्टायलिश ब्लाउजसोबत हा लूक खूपच आकर्षक दिसतो.
पिंक, पीच, लॅव्हेंडर, मिंट ग्रीन किंवा स्काय ब्लू यांसारख्या पेस्टल रंगांच्या कॉटन साड्या फ्रेश आणि एलिगंट लूक देतात. उन्हाळ्यासाठीही हा पर्याय उत्तम आहे.
ट्रेंडी लूकसाठी कॉटन साडीसोबत स्लीव्हलेस, पफ स्लीव्ह, बोट नेक किंवा कॉन्ट्रास्ट प्रिंटेड ब्लाउज ट्राय करा. यामुळे पारंपरिक साडीला मॉडर्न टच मिळतो.