Shruti Vilas Kadam
व्हॅसलीन त्वचेवर एक संरक्षणाचा थर तयार करून नमी लॉक करते. त्यामुळे कोरडी, खडबडीत त्वचा त्वरित मऊ होते.
कोरडे, फुटलेले किंवा जास्त सुकलेले ओठ मऊ करण्यासाठी व्हॅसलीन सर्वात प्रभावी उपाय आहे. लिप बाम म्हणून रोज वापरता येते.
रात्री झोपण्यापूर्वी टाचांवर व्हॅसलीन लावल्यास टाचा मऊ होतात आणि क्रॅक्स कमी होण्यास मदत होते.
कोरडी पडलेली कोपर आणि गुडघ्यांची त्वचा व्हॅसलीन लावल्याने मऊ आणि गुळगुळीत होते.
वॉटरप्रूफ मेकअप किंवा मस्करा सहजपणे काढण्यासाठी व्हॅसलीन खूप उपयोगी आहे. त्वचा सुद्धा मऊ राहते.
क्युटिकल्स किंवा नखांच्या कडा सुकल्यास व्हॅसलीन लावल्याने ते मऊ होतात आणि नखे मजबूत दिसतात.
हलक्या खरचटल्यावर किंवा त्वचेवर घर्षण झाल्यावर व्हॅसलीनचा पातळ थर लावल्यास त्वचेचे संरक्षण होते आणि जलन कमी होते.