Prajkta Wedding: मालिकेतील येसूबाईंचा खऱ्या आयुष्यातील शुंभराजसोबत विवाह संपन्न,पाहा प्राजक्ताच्या लग्नाचे सुंदर PHOTO

Shruti Vilas Kadam

लग्नबंधनात अडकले

प्राजक्ता गायकवाड आणि शंभुराज खुटवड यांनी २ डिसेंबर २०२५ रोजी विवाहबंधनात अडकत नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे.

Prajkta Wedding

शाही आणि पारंपरिक लग्न लूक चर्चेत

लग्नाच्या दिवशी प्राजक्ताने हिरव्या रंगाची नऊवारी साडी, पारंपरिक नथ, बांगड्यांचा चुडा आणि शाल परिधान केली होती. शंभुराजचा पारंपरिक लूकही चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला.

Prajkta Wedding

साखरपुड्यानंतर लग्नसोहळा पार पडला

ऑगस्ट २०२५ मध्ये त्यांचा साखरपुडा झाला होता. त्यानंतर केळवण, हळद, मेहंदी असे सर्व लग्नपूर्व विधी उत्साहात पार पडले आणि अखेर दोघांचा विवाहसोहळा साजरा झाला.

Prajkta Wedding

लग्नपूर्व विधींनी रंग भरले

प्राजक्ताच्या घरी पार पडलेल्या मेहंदी, घाणा आणि इतर विधी अत्यंत पारंपरिक पद्धतीने झाले. तिच्या मेहंदीवर शंभुराजचे नाव सुबकपणे रेखाटलेले होते.

Prajkta Wedding

चाहत्यांमध्ये उत्सुकता आणि आनंदाचा माहोल

प्राजक्ता लोकप्रिय अभिनेत्री असल्यामुळे तिच्या लग्नाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता होती. लग्नाच्या फोटोंवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Prajkta Wedding

अनपेक्षित प्रेमकथा – ‘दादा’ ते ‘जीवनसाथी’

प्राजक्ताने सांगितले की, सुरुवातीला तिने शंभुराजला ‘दादा’ म्हणून संबोधले होते. ओळखीचे नाते हळूहळू मैत्रीत, आणि नंतर प्रेमात बदलले. आता ते जीवनसाथी झाले आहेत.

Prajkta Wedding

मनोरंजनविश्वात आनंदाचे वातावरण

या विवाहामुळे संपूर्ण मराठी मनोरंजन क्षेत्रात आनंदाचे वातावरण पसरले आहे. सोशल मीडियावर अभिनंदन संदेश, पोस्ट्स आणि चर्चांची लगबग सुरू आहे.

Prajkta Wedding

बांदेकर कुटुंबात नव्या 'होम मिनिस्टर'चं स्वागत, पाहा सोहमच्या लग्नातील खास PHOTO

Soham Bandekar Wedding
येथे क्लिक करा