Shruti Vilas Kadam
ग्लिसरीन हे humectant असल्याने त्वचेत ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करू शकते. त्यामुळे त्वचा मऊ आणि हायड्रेटेड वाटू शकते.
गुलाबपाणी त्वचेला ताजेतवाने वाटण्यास मदत करू शकते. त्यामुळे या मिश्रणाचा वापर साध्या स्किनकेअर रुटीनमध्ये करता येतो.
एका स्वच्छ वाटीत १ चमचा ग्लिसरीन आणि ४ टेबलस्पून गुलाबपाणी घेऊन दोन्ही पदार्थ चांगले मिसळा.
चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर त्यावर हा स्प्रे वापरा त्यानंतर स्वच्छ बोटांनी चेहऱ्यावर हलक्या हाताने लावा.
हा स्प्रे रात्री स्किनकेअर रुटीनमध्ये वापरता येते. त्वचेला चिकटपणा जाणवत असल्यास कमी प्रमाणात लावणे योग्य.
त्वचा कोरडी किंवा रुखरुखीत वाटत असल्यास ग्लिसरीनमुळे त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यास मदत होऊ शकते.
कोणतेही DIY मिश्रण चेहऱ्यावर वापरण्यापूर्वी हाताच्या छोट्या भागावर पॅच टेस्ट करा. जळजळ, लालसरपणा किंवा खाज आल्यास वापर थांबवा.