Shruti Vilas Kadam
हनुवटी, जबडा किंवा तोंडाभोवती वारंवार येणारे पिंपल्स अनेकदा हार्मोनल अॅक्नेमुळे होतात. महिलांमध्ये हार्मोन्समधील बदल हे यामागचे प्रमुख कारण असू शकते.
सततचा ताण, अपुरी झोप आणि व्यस्त जीवनशैलीमुळे कॉर्टिसोलसारख्या हार्मोन्समध्ये बदल होतात. त्यामुळे तेलग्रंथी अधिक सक्रिय होऊन पिंपल्स वाढू शकतात.
जास्त साखर, प्रक्रिया केलेले पदार्थ, डेअरी उत्पादने किंवा व्हे प्रोटीनचे अतिसेवन काही लोकांमध्ये हार्मोनल अॅक्ने वाढवू शकते. संतुलित आहार त्वचेसाठी फायदेशीर ठरतो.
पिंपल्स दाबल्याने संसर्ग वाढू शकतो आणि चेहऱ्यावर कायमचे डाग किंवा खड्डे पडण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांना हात लावणे टाळा.
दिवसातून दोन वेळा सौम्य फेसवॉशने चेहरा स्वच्छ करा. नॉन-कॉमेडोजेनिक मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीनचा नियमित वापर केल्यास त्वचा निरोगी राहण्यास मदत होते.
पिंपल्स सतत येत असतील, मासिक पाळी अनियमित असेल किंवा पीसीओएसची लक्षणे असतील तर त्वचारोगतज्ज्ञ किंवा स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
पुरेशी झोप, नियमित व्यायाम, तणाव नियंत्रण, भरपूर पाणी पिणे आणि संतुलित आहार या सवयी हार्मोनल अॅक्ने कमी करण्यास मदत करू शकतात.