ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
प्रत्येकाला एक सुंदर आणि तुकतुकीत त्वचा हवी असते.
यासाठी महागडी सौंदर्य उत्पादने वापरली जातात, ट्रिटमेंट्स घेतले जातात. पण याचा काही उपयोग होत नाही.
पण तुम्हाला माहीत आहे का? तुमच्या रोजच्या आहारातील काही पदार्थच तुमच्या त्वचेच्या नुकसानीचे कारण ठरतात.
चीज एक प्रथिनेयुक्त पदार्थ असला तरी तो पचनास जड असतो. दररोजच्या आहारात चीजचा समावेश असल्यास परिणामी त्वचा लवकर म्हातारी होते.
पॅकेज्ड फूडमध्ये जास्त प्रमाणात प्रिझर्वेटिव्ह वापरले जातात. यामुळे कुरकुरे, चिप्स यांसारखे पॅकेज्ड फूड खाल्ल्यास चेहऱ्यावर पुरळ किंवा डाग येऊ शकतात.
अति प्रमाणात मिठ असलेले पदार्थ जसे कि, लोणचे सतत खाल्ल्याने त्वचा काळवणण्याची शक्यता असते.
यापासून वाचण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात बदल करणे आवश्यक आहे.
तुमच्या आहारात भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी असलेली फळे आणि भाज्यांचा समावेश करा.
ओमेगा-३ फॅटी ऍसिड असलेले नट्स आणि बिया देखील त्वचेची निगा राखण्यास मदत करतात.