Sakshi Sunil Jadhav
बऱ्याच महिलांना चेहऱ्याला हात लावण्याची सवय असते.
तुम्हाला माहितीये का? चेहऱ्याला सतत हात लावल्याने तुम्हाला विविध समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.
आपण सतत हाताने वेगवेगळ्या गोष्टींना हात लावत असतो. त्यामुळे हातावर बॅक्टेरिया जमा होतो.
तुम्ही हेच हात चेहऱ्याला लावत असाल तर तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स आणि मुरुमे येवू शकतात.
त्वचेवर असलेली छोटी छिद्र चेहऱ्यावरील तेलाने आणि दुर्गंधीने ब्लॉक होतात. चेहऱ्यावरची छोटी छिद्र ब्लॉक झाल्याने मुरुमे यायला सुरुवात होते.
काही लोक सतत पिंपल्सला हात लावतात. किंवा ते फोडतात त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर डाग पडू शकतात.