ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
वयानुसार त्वचेमध्ये बदलाव होत असतात. सुरुकुत्या येणे हि एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. योग्य आहार आणि पोषणा घेतल्यास त्वचा टवटवित ठेवून त्वचेचे आयुष्य वाढवू शकतो.
दररोज मूठभर बदाम खा. व्हिटॅमिन E ने समृद्ध असलेले बदाम त्वचेची दुरुस्ती करण्यास मदत करतात.
ब्लूबेरीज अॅंटीऑक्सिडंट्सने समृद्ध असल्याने, त्या त्वचेचे आयुष्य रोखण्यास मदत करतात. याव्यतिरिक्त व्हिटॅमिन सी असलेले फळे देखील फायदेशीर असतात.
व्हिटॅमिन A, C, E आणि K ने समृद्ध असलेला पालक त्वचेला ओलावा आणि लवचिकता प्रदान करतो.
ओमेगा ३ फॅटी ॲसिडने समृद्ध असलेले अक्रोड त्वचेची जळजळ कमी करतात आणि सुरुकुत्या नियंत्रित करण्यास मदत करतात.
टॉमॅटोमध्ये लायकोपीन भरपूर प्रमाणात असते, जे त्वचेचे संरक्षण करते आणि सुरुकुत्या कमी करते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.