Shruti Vilas Kadam
नारळाचे तेल त्वचेला खोलवर आर्द्रता देते. त्यामुळे कोरडी आणि निस्तेज त्वचा मऊ, मुलायम आणि तजेलदार दिसण्यास मदत होते.
नारळाच्या तेलातील फॅटी अॅसिड्स त्वचेचा नैसर्गिक बॅरिअर टिकवून ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे त्वचेतील ओलावा दीर्घकाळ टिकतो.
नियमित आणि मर्यादित प्रमाणात वापर केल्यास त्वचेचा पोत सुधारण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो दिसू शकतो.
नारळाचे तेल वॉटरप्रूफ मेकअप आणि सनस्क्रीन सहज काढण्यास मदत करते. त्यानंतर सौम्य फेसवॉशने चेहरा स्वच्छ धुवावा.
यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स त्वचेचे पर्यावरणीय घटकांपासून होणारे नुकसान कमी करण्यास मदत करू शकतात.
रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर हलक्या हाताने नारळाच्या तेलाचा मसाज केल्यास त्वचेला आराम मिळतो आणि कोरडेपणा कमी होऊ शकतो.
ओठ, नाकाच्या बाजू किंवा कोरडे पडणाऱ्या भागांवर नारळाचे तेल लावल्यास त्वचा मऊ राहण्यास मदत होते.