ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
नारळ तेल हे मॉइश्चरईजर म्हणून प्रसिध्द असून काही बाबींमध्ये नारळ तेल त्वचेला नुकसान पोहचवू शकते.
नारळाचे तेल घट्ट असते आणि त्यामुळे चेहऱ्यावर येणारे बारिक छिद्रे म्हणजेच रोमछिद्रे बंद होऊ शकतात.
तेलकट त्वचेवर नारळाचे तेल लावल्याने पिंपल्सचे येणे वाढू शकते.
काही लोकांना नारळाच्या तेलाची अॅलर्जी होऊ शकते, जसे की, खाज येणे आणि चेहऱ्यावर लालसरपणा येणे.
नारळाचे तेल सेंसेटिव्ह त्वचेवर लावल्याने जळजळ आणि रॅशेसचे कारण बनू शकते.
नारळाच्या तेलाच्या अतिवापरामुळे त्वचेचा नैसर्गिक आर्द्रतेचा समतोल बिघडू शकतो.
नारळाच्या तेलामध्ये UV किरणांपासून संरक्षण करण्याची क्षमता नसते, ज्यामुळे त्वचेचे नुकसान होते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.