Shruti Vilas Kadam
चेहऱ्यावर पिंपल्स आल्यावर ते दाबून फोडणे टाळावे. असे केल्याने पिंपल्समधील घाण, तेल आणि जीवाणू त्वचेच्या आत जाऊ शकतात. त्यामुळे सूज वाढू शकते आणि जास्त पिंपल्स होऊ शकतात.
पिंपल्स वारंवार फोडल्याने त्वचेला इजा होऊ शकते. त्यामुळे चेहऱ्यावर काळे डाग होण्याची शक्यता आहे. विशेषतः खोल आणि दुखणारे पिंपल्स फोडणे टाळावे.
हातांवर असलेले जीवाणू पिंपल्स फोडताना त्वचेच्या आत जाऊ शकतात. त्यामुळे संसर्ग होण्याचा आणि त्वचेवर लालसरपणा वाढण्याचा धोका असतो. चेहऱ्याला वारंवार हात लावणेही टाळावे.
पिंपल्समुळे सूज किंवा वेदना होत असल्यास कापडात गुंडाळलेला बर्फ थोड्या वेळासाठी पिंपल्सवर लावल्याने आराम मिळू शकतो. बर्फ थेट त्वचेवर लावू नये.
पिंपल्स कमी करण्यासाठी सॅलिसिलिक ॲसिड किंवा बेंझॉयल पेरॉक्साइड उपयोगी ठरू शकतात. संवेदनशील त्वचा असल्यास त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
हायड्रोकॉलॉइड पिंपल्स पॅच पिंपल्स वाढण्यास आणि इन्फेक्शन थांबवण्यास मदत करतो. त्यामुळे काही वेळा तुम्ही त्याचा वापर करु शकता.
चेहऱ्यावर वारंवार पिंपल्स येत असतील, मोठे आणि दुखणारे पिंपल्स होत असतील किंवा डाग पडत असतील, तर त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या.